उर्वरित लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार मागील सर्व हप्त्याचे पैसे

उर्वरित लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार मागील सर्व हप्त्याचे पैसे

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सरकारला 2.5 कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्यांमध्ये 7500 रुपये देण्यात येणार आहेत.

फक्त याच बहिणींना मिळणार उर्वरित हप्ते

काही महिलांना अद्याप लाभ का नाही?

बऱ्याच महिलांनी सर्व अटी आणि शर्तींनुसार अर्ज भरला, आणि तो मंजूरही झाला आहे. तरीही, काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तांत्रिक अडचणी आणि बँक खात्यांचे आधारशी लिंक नसल्यामुळे या महिलांना लाभ मिळण्यात विलंब झाला आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर होणार लाभ

सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे महिला व बालविकास विभागाने लाभ प्रक्रिया थांबवली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच, उर्वरित महिलांच्या खात्यात योजना अन्वये लाभ जमा होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सर्व महिलांना नोव्हेंबर महिन्यात मिळणार सर्व हप्त्यांचे पैसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना मिळणारे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर, सहाव्या हप्त्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात येतील. तसेच, ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना देखील सर्व हप्त्यांचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील पात्र महिलांना, आचारसंहिता संपल्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात सर्व हप्त्यांचे पैसे मिळतील.

Leave a Comment