Loan Waiver 2024 : तेलंगाना सरकारने दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचा 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.
बँक ऑफ बडोदा देत आहे 50,000/ रुपये ते 5 लाख रुपये कर्ज
येणाऱ्या काही महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. शेतकऱ्यांची सरकारवर असलेली नाराजी दूर करण्यासाठी सरकार महत्त्वाचा निर्णय येत्या विधानसभा निवडणुका अगोदर घेऊ शकते.
पोस्ट ऑफिस ची योजना – महिलांना दर महिन्याला मिळणार 3,000/- रुपये
27 जूनपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी चर्चेचा विषय होऊ शकते, असं बोललं जात आहे.
विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये महायुतीबद्दल नाराजी आहे. गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या. सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ज्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकांमध्ये बसला आहे.
बँक ऑफ बडोदा कडून 5 लाख रुपये वैयक्तिक कर्ज, 2 मिनिटात मिळवा
विधानसभेतही शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहील असे दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करू शकतं, अशी चर्चा आहे.
शेतकऱ्यांची मागणी
पूर्वीही, 2023 च्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासन हवेत विरले. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत तफावत स्पष्ट दिसून आली.
त्याआधी, 2017 आणि 2020 साली अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, त्यावेळीही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे सरकारने फक्त घोषणा करून वेळ न मारता ठोस निर्णय घेऊन शेतकरी कर्जमाफी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.