Crop insurance : महाराष्ट्रातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार ₹2555 कोटींची विमा नुकसान भरपाई

Crop insurance : महाराष्ट्र सरकारने 64 लाख शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट रु. 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. ही माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित रु. 2852 कोटी राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

Table of Contents

आधार संलग्न बँक खात्यावर थेट रक्कम जमा Crop insurance

या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

64 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ

खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 साठी रु. 2.87 कोटी, खरीप 2023 साठी रु. 181 कोटी, रब्बी 2023-24 साठी रु. 63.14 कोटी आणि खरीप 2024 साठी रु. 2308 कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रु. 2555 कोटींचा लाभ 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, विमा नुकसान भरपाईची रक्कम तातडीने खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Comment