कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्यांचे वेतन गुढीपाडवा,रमजान ईद सणापुर्वी दि.25 मार्चला अदा करणेबाबत नविन परिपत्रक जारी

Maharashtra Employees March Salary Update; राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्यांचे वेतन हे गुढीपाडवा व रमजान ईद सणापुर्वी म्हणजेच दिनांक 25 मार्चला अदा करणेबाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 12 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे मार्च महिन्याचे वेतन दिनांक 25 मार्च 2025 पुर्वी अदा होणेबाबत विषयान्कित परिपत्रक मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रक हे श्री.साजिद निसार अहमद , राज्य सरचिटणीस , आखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक 22.02.2025 रोजीचे निवेदन पत्र व श्री.शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्थ फाउंडेशन यांचे दिनांक 05.03.2025 रोजीचे निवेदन पत्रानुसार परिपत्रक सादर करण्यात आले आहेत.

सदर वरील नमुद दोन्ही निवेदन पत्रानुसार अवलोकन करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

व संदर्भिय निवेदनांमध्ये माहे मार्च 2025 चे वेतन गुढी पाडवा , रमजान ईद सणापुर्वी दिनांक 25 मार्चला अदा करणेबाबत , विनंतमी करण्यात आलेली आहे तरी याबाबत योग्य आदेश होण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment