महिलांना दरवर्षी मिळणार 25,200/- रुपये, वाचा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती, आणि सध्या महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळत आहे.

योजनेचे फायदे

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, म्हणजेच एकूण वार्षिक 18,000 रुपये. तसेच, महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यास, या रकमेची वाढ केली जाईल, आणि पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेयचा असेल तर येथे पहा सविस्तर माहिती

पात्रता निकष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत:

  • अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • तिचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • विवाहित, अविवाहित, घटस्फोटित किंवा निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • महिलेचे कोणत्याही बँकेत खाते असावे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अपात्रता निकष

या योजनेसाठी काही महिलांना अपात्र मानले गेले आहे. अपात्र महिलांचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
  • ज्या महिलांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्यांनी सरकारी नोकरी अथवा कंत्राटी नोकरीत कायम स्वरूपी पद घेतले असेल, किंवा सेवानिवृत्तीनंतरचे वेतन घेत असेल.
  • ज्या महिलांनी इतर सरकारी योजनांतून दरमहा 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • कुटुंबात विद्यमान किंवा माजी आमदार-खासदार असल्यास.
  • पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन किंवा चार चाकी वाहन असल्यास (ट्रॅक्टर वगळून).

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी नजीकच्या सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर अर्ज करावा.

Leave a Comment