Maharashtra ladki bahin scheme : मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणार आहे.

मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा करण्याची योजना आखली जात आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाने लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रातही राबविण्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सुमारे दीड कोटी महिलांना होईल अशी अपेक्षा आहे.

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलांसाठी ‘लाडली बहना’ योजना आणली, ज्याअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,250 रुपये जमा होऊ लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर योजनेचे सादरीकरण झाले. त्यांनी काही बदल सुचवले असून, त्यानुसार योजना सुधारित केली जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये दरमहा 1,250 रुपये दिले जातात, परंतु महाराष्ट्रात त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. महिला व बालकल्याण विभागाने आधीच लेक लाडकी योजना आणली आहे.
अशी असेल अटी आणि पात्रता
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक असणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयाची अट 21 वर्षे ते 60 वर्षे इतकी आहे.
- महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये ही अट आहे.
- पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांतील महिलांना लाभ दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले,
सदरील योजना मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहन’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहिण योजना या नावाने राबविली जाणार असून सदरील योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच ही योजना राज्यात सुरु केली जाणार आहे.