Maharastra Mansoon Update : सध्या शेतीची पूर्व मशागत बऱ्यापैकी पूर्ण झाली असून, सध्या शेतकऱ्याचे लक्ष मिर्गातल्या पावसावर लागले आहे. परंतु सध्या वरुण राजा वेळेवर शेतकऱ्यांना साथ देत नाही; परंतु या वर्षी वरून राजाचे आगमन कधी असेल हे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी स्पष्ट सांगितले.
34km मायलेज असलेली मारुती वॅगनार दुचाकी च्या किमतीत खरेदी करा
मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सून कधी दाखल होणार? याबद्दलची उत्सुकता सर्वांनाच निर्माण झाली आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिली माहिती
भारतात साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पाऊस दाखल होतो, तर सप्टेंबर महिन्यात पाऊस माघारी फिरतो. मागच्या वर्षी 8 जूनला दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे.
आणखी माहिती येथे वाचा
यावर्षी अंदमानमध्ये 22 मे रोजी मान्सून पोहोचेल. साधारणपणे याच दिवशी अंदमानमध्ये दाखल होतो. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार यावर्षी जुलै महिन्यात पाऊस भरपूर पडेल, तसंच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. तर ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडेल, यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढेल. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातही चांगला पाऊस होईल. यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. आयएमडीनेही यावर्षी भारतात चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार भारतात 106 टक्के पाऊस होऊ शकतो.
महाराष्ट्रात या दिवशी मान्सून दाखल होणार?
महाराष्ट्रात साधारणपणे 7 ते 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचतो. पण मागच्यावर्षी बिपरजॉय वादळामुळे मान्सून 11 जूनला आला होता. तळकोकणात दाखल झाल्यानंतर मुंबईत मान्सून 15 जूनच्या आसपास येतो.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे की, महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सूनला सुरूवात होईल; पण पेरणीसाठी उपयुक्त पाऊस 22 जूननंतर सुरू होईल. 25 ते 27 जूनपर्यंत महाराष्ट्रात मोसमातला पहिला चांगला पाऊस पडेल, असेही त्यांनी सांगितलं आहे.