मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ₹2100 यादीत नाव तपासा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी विशेष योजना आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केली आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले होते.
योजनेच्या अंमलबजावणीतून सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
महायुती सरकारने सत्तेत येताना महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत महिलांच्या खात्यात ₹1500 रुपये जमा करण्यात आले. मात्र आता सरकार मार्च 2025 च्या अर्थसंकल्पात वाढीव रक्कमेची तरतूद करून महिलांना दरमहा ₹2100 रुपये देणार आहे.
लाडकी बहीण योजना 2100 यादी पात्रता निकष
पात्र महिलांना ₹2100 मिळण्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- कुटुंबाच्या नावावर चार चाकी वाहन नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता नसावा.
- कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी महिला इतर कोणत्याही केंद्र किंवा राज्य आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी.
महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची तारीख
महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मार्च 2025 नंतर महिलांच्या खात्यात दरमहा ₹2100 जमा केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजना महत्त्वाची माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
---|---|
अंमलबजावणीची तारीख | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | ₹2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला |
आर्थिक मदत | ₹2100 दरमहा |
अंतिम तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
2100 रुपये मिळण्यासाठी कशी यादी तपासाल?
राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. यादी तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर भेट द्या आणि आपल्या नावाची पडताळणी करा.
ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा टप्पा आहे. जर आपण पात्र असाल तर वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ मिळवा.