2005 नंतर नियुक्त झालेल्या या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

Old Pension Scheme : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

2005 नंतर नियुक्त झालेल्या या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या घोषणेमुळे शिक्षक वर्गात समाधानाची भावना निर्माण झाली आहे, कारण जुनी पेन्शन योजना ही अधिक फायदेशीर मानली जाते. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आणि अंमलबजावणी कशी केली जाईल, याबद्दल अधिक माहिती येत्या काळात समजेल.

2005 नंतर नियुक्त झालेल्या या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

राज्यातील 2005 आधीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून राज्य सरकारने दिलासा दिला होता. 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशी मागणी होती. ती मागणी लवकरच पूर्ण केली जाईल. 2005 नंतरच्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. जळगाव येथे नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

“माता-पित्यानंतर समाजात सर्वाधिक आदर शिक्षकांना मिळतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, . शिक्षक हे राज्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांना दुखवू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment