जम्मू काश्मीर पहलगांमधील ; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल | Pahalgam Video

Pahalgam Video : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. बैसरन पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून ठार मारले.

या घटनेचा आता देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर आता पर्यटकांचा एक काळीज पिळवटून एक व्हिडीओ समोर आला आहे.

त्यात भारतीय लष्कराच्या जवानांना पाहून पर्यटक भयभीत झाल्याचे दिसतेय. पर्यटक जवानांना पाहून हात जोडून आपल्या जीवासाठी याचना करतान दिसताय.

या दहशतवादी हल्ल्यानंतरचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यात त्या क्षणानंतरचे भयाण वास्तव स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू करताच अनेक पर्यटक जीव वाचवण्यासाठी कसे घाबरून पळताहेत हे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसतेय.

धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वेशात येत पर्यटकांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे हल्ल्यानंतर काही वेळाने मदतीसाठी धावून आलेल्या लष्कराच्या जवानांना पाहूनही पर्यटक बिथरले. त्यांच्याकडे पाहून आम्हाला मारू नका, अशी दया याचना करु लागले.

“माझ्या मुलांना काय करू नका, माझ्या पतीला ठार मारले”

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दहशतवादी हल्ल्यातून बचावलेले भयभीत झालेले पर्यटक काश्मीर घाटीतून चालत होते. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना रोखले.

View this post on Instagram

A post shared by @udhampurofficialbackup

जवानांना पाहून अनेक पर्यटक महिला आणि मुलांनी अक्षरश: टाहो फोडला. त्यांना वाटले की, हेही लष्कराच्या वेशात आलेले दहशतवादी आहेत. बिथरलेली एक महिला, “माझ्या मुलांना काय करू नका, माझ्या पतीला ठार मारले”, असं हात जोडून रडत जवानांना सांगताना दिसतेय.

जवळची व्यक्ती गमावल्याचे दु:ख आणि स्वत:सह कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठीची तिची धडपड या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतेय.

यावेळी अनेक लहान मुले जवानांच्या हातात बंदुका पाहिल्यावर जोरजोरात रडताना दिसतायत. केवळ महिला, मुलेच नाहीत, तर इतर पुरुषही बिथरलेल्या अवस्थेत जवानांना जीव वाचवण्यासाठी याचना करताना दिसतायत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य (Pahalgam terror attack Viral Video)

यावेळी भारतीय जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, सर्व पर्यटकांना एका ठिकाणी बसवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पर्यटकांचे दु:ख समजून घेत कोणी जखमी पर्यटक तर नाही ना याबाबत विचारणा केली. काळीज पिळवटून टाकणारे असे हे दृश्य आहे.

अनेकांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले आहेत. कमेंट बॉक्समध्येही अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तर, काही जणांनी हे फारच भीतीदायक दृश्य असल्याचे म्हटलेय.

Leave a Comment