पीएम किसान योजनेबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये, 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, मात्र वारसा हक्काद्वारे जमीन मिळालेल्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. अर्ज करताना पती-पत्नी आणि मुलांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच, कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
19 वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर; येथे पहा
पीएम किसान योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. त्याचप्रमाणे, राज्य सरकारकडूनही 6 हजार रुपये मिळतात. त्यामुळे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती-पत्नी यांपैकी एकाला किंवा 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला घेता येतो. फक्त 2019 पूर्वी जमीन खरेदी असल्याची नोंद असणे आवश्यक आहे, किंवा वारसा हक्काने जमीन मिळाल्यास योजनेचा लाभ घेता येईल.
येथे पहा सविस्तर माहिती
नवीन नियमानुसार आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा आणि ८ (अ) उतारा – नवीन उतारे अनिवार्य आहेत.
- पती-पत्नीचे आधार कार्ड – दोघांचे आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे.
- फेरफार तसेच विहीत नमुना अर्ज – हा अर्जही आवश्यक आहे.
- शिधापत्रिका – शिधापत्रिकाही जोडणे आवश्यक आहे.
१९ वा हप्ता कधी मिळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑक्टोबर रोजी १८ वा हप्ता जारी केला. शेतकऱ्यांना आता १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अंदाजानुसार, हा हप्ता फेब्रुवारी २०२5 मध्ये मिळू शकतो, परंतु याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.