Police Bharti 2024:राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने विविध पदाकरिता शासकीय भरती जाहीर केली होती व काय भरती प्रक्रिया अजून बाकी आहे.
तसेच राज्य शासकीय विभागाच्या भरती प्रक्रिया बाबत आचारसंहितामुळे अडथळा आला होता.
राज्यामध्ये सध्या बेरोजगार तरुण पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे बऱ्याच दिवसापासून केलेली मेहनत त्याचं काहीतरी चीज व्हावा यासाठी तरुण प्रयत्न करत असतात.
पोलीस दलात भरती होण्याकरता भरती उमेदवारांना लेखी परीक्षा आणि फिजिकल परीक्षा द्यावी लागत असते त्यामुळे तरुण ग्राउंडवर देखील तयारी करत असतात.
पण मात्र या तयारी करत असणाऱ्या उमेदवारांपैकी एक लाख वीस हजार उमेदवारांना भरती प्रक्रिया उशिरा होत असल्याकारणाने मोठा धक्का बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना काळामध्ये भरती उमेदवारांना भरती प्रक्रियेत वयामध्ये दोन वर्ष सवलत दिली गेली होती.
वयोमर्यादा मध्ये दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शितल केली गेली होती.
मात्र त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर भरतीचा विषय लांबणीवर पडला.
यावर्षी म्हणजेच चालू वर्षांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे पण मात्र ज्या उमेदवाराची वयोमर्यादा पार केली आहे.
असे एकूण उमेदवार एक लाख वीस हजार यांना भरती प्रक्रिया उशिरा होत असल्याने फटका बसू शकतो.
पुन्हा एकदा वयोमर्यादेमध्ये मुदतवाढ देत शेवटची संधी द्यावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा