Ration Card New Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता रेशन दुकानात धान्या ऐवजी पैसे मिळणार आहेत त्या संबंधी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 20/06/2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे.

त्यानुसार, राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशीव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये/- इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct) शासन परिपत्रक क्रमांकः अधापु-२०२४/प्र.क्र. ४६/नापु-२२ Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, २०१५ मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम (पुढील दशकाच्या पूर्णांकात) थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशीव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल, 2024 पासून प्रति माह प्रति लाभार्थी 170/- रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु तुम्ही जर केशरी रेशन कार्ड धारक असून सुद्धा तुम्हाला धान्य ऐवजी पैसे मिळत नसतील तर पुढे दिलेला फॉर्म पूर्ण भरून त्यासोबत रेशन कार्ड ची झेरॉक्स ( पहिल्या आणि शेवटच्या पानाची) तसेच आधार कार्ड ची झेरॉक्स जोडून सदरील फॉर्म तुमच्या रेशन कार्ड दुकानात जमा करावा लागणार आहे.