Government employees Salary Hike : आताच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% करण्यात आला म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकूण 4% वाढ करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ही वर्षातून दोनदा केली जाते, ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही जानेवारी आणि जून महिन्याच्या दरम्यान होत्या अश्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही माहे जानेवारी मध्ये करण्यात येते.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही जुलै ते डिसेंबर मध्ये होते त्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही माहे जुलै मध्ये अदा करण्यात येते.

त्याच प्रमाणे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील माहे जुलै मध्ये 4% महागाई भत्ता वाढ करण्यात येणार आहे.
तुम्ही जर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी असाल तर माहे जुलै मध्ये महागाई भत्ता 50% होणार आहे.

अशी होईल 19,200/- रू. पगारात वाढ
समजा तुमचा पगार 40,000/- रुपये आहे, तर 4% महागाई भत्ता वाढ केल्यावर 1600/- रुपये पगारात वाढ होईल म्हणजेच वार्षिक 19,200/- रुपये वाढ होईल.