Ration Card Update : पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना ही मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार, फक्त हे काम करा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपनियंत्रक शिधावाटप, मुंबई यांना दिनांक 18 जून 2024 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सदरील परिपत्रक पुढील प्रमाणे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक 28 जुलै 2023 व्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे .

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यावरच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड चा लाभ मिळणार आहे, आणि सदरील योजने द्वारे 5 लाखांपर्यंत हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
