Gold Rate : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण – १० ग्रॅम ₹५६,००० होण्याची शक्यता! – कारण जाणून घ्या

Gold Rate : सोनेच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 93,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे, परंतु अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत या किमतीत 38% घट होऊ शकते. त्यामुळे सोने 56,000 रुपयांच्या खाली जाऊ शकते.

या घसरणीमागील महत्त्वाची कारणे म्हणजे जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे पुरवठा 9% ने वाढून 2,16,265 टन झाला आहे. तसेच, मध्यवर्ती बँकांची मागणी घटण्याची शक्यता आहे, कारण गेल्या वर्षी त्यांनी 1,045 टन सोने खरेदी केले होते, परंतु आता त्यांची खरेदी कमी होईल. याशिवाय, 2024 मध्ये सोने खाण कंपन्यांमध्ये 32% विलिनीकरण व अधिग्रहण झाले आहे, ज्यामुळे बाजार गाठलेला उच्चांक दर्शवतो.

तथापि, सर्व तज्ज्ञ या घसरणीशी सहमत नाहीत. बँक ऑफ अमेरिकाच्या मते, पुढील दोन वर्षांत सोने $3,500 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते, तर गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार, 2025 च्या अखेरीस सोने $3,300 प्रति औंसपर्यंत जाऊ शकते.

Leave a Comment