इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा ‘या’ सोप्या पद्धतीने

इंजेक्शन दिलेलं किंवा भेसळयुक्त कलिंगड ओळखण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण लक्षात ठेवली, तर सहजपणे सुरक्षित आणि नैसर्गिक कलिंगड निवडू शकता. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या या फळाची निवड करताना ही काळजी घेतली पाहिजे.

Table of Contents

1. इंजेक्शन (रंग टोचणे)

काही व्यापारी कलिंगड अधिक आकर्षक दिसावं यासाठी त्यामध्ये एरिथ्रोसिन सारखं लाल रंगाचं रसायन टोचतात. हे रसायन आरोग्यासाठी घातक असतं आणि त्यामुळे अन्न विषबाधा, त्वचाविकार किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे रंगवलेलं कलिंगड टाळावं.

2. पिवळे डाग असलेले कलिंगड

जमिनीत नैसर्गिकरीत्या वाढलेल्यया सेंद्रिय (Organic) कलिंगडावर बहुतेक वेळा हलके पिवळसर किंवा तपकिरी डाग दिसतात. हे डाग त्याच्या नैसर्गिक वाढीचे लक्षण आहेत. अशा कलिंगडाला रासायनिक खतं किंवा रंग वापरलेले नसतात.

3. भेगा (Cracks)

कलिंगड कापल्यावर त्याच्या आतल्या भागात जर मोठ्या, स्पष्ट भेगा किंवा ओळी दिसत असतील, तर त्यामध्ये वाढवण्यासाठी रासायनिक स्टेरॉइड्स किंवा इंजेक्शनचा वापर झालेला असतो. हे कलिंगड नैसर्गिक नसतं.

4. कापूस चाचणी

कलिंगड भेसळयुक्त आहे की नाही हे पाहण्यासाठी एक सोपी चाचणी म्हणजे कापूस चाचणी:

  • कलिंगड कापून त्यावर स्वच्छ पांढऱ्या कापसाचा बोळा हलकासा दाबा.
  • जर कापूस लगेचच लालसर किंवा गुलाबी झाला, तर कलिंगडमध्ये कृत्रिम रंग मिसळलेला असतो.

5. खूप गडद रंग

कलिंगडाचा रंग नैसर्गिक असतो तेव्हा तो गडद लाल नसतो, तर सौम्य, चमकदार लालसर दिसतो. जर तो रंग खूप गडद आणि कृत्रिम वाटत असेल, तर तो शक्यतो रंग मिसळून तयार केलेला असतो.

6. नैसर्गिक चव आणि वास

सेंद्रिय आणि नैसर्गिक कलिंगडाला सौम्य गोडसर चव आणि एक ताजातवाना वास असतो. त्याउलट, भेसळ केलेल्या कलिंगडाची चव थोडीशी कृत्रिम, कधी कधी उग्र किंवा बेस्वादही वाटू शकते.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पोषणदायक अशा कलिंगडाची खरेदी करताना वरील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नैसर्गिक उत्पादन निवडणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

Leave a Comment