Weather Update : राज्यात येत्या 3 ते 4 तासांत कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Update : राज्यात येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या 3 ते 4 तासांत अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोने आणि चांदी झाले पुन्हा स्वस्त, पहा आजचा ताजा भाव

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण झपाट्याने बदलत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी तापमान वाढत आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान पुन्हा वाढले आहे. दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालाची तारीख ठरली, येथे पहा निकाल

मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये पोहोचला असून आता पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मालदीवच्या काही भागांवर मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड चे काय करतात? पहा डिटेल्स

Leave a Comment