8 व्या वेतन आयोगाला मंजुरी: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून, 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी अनेक दिवसांपासून 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन अखेर मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू
लवकरच एक समिती स्थापन करून 8 व्या वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या आयोगाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव ठरवले जातील.
2026 पासून 8 वा वेतन आयोग लागू
केंद्र सरकारने जाहीर केले आहे की, 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाईल. 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू होता, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ मिळाला होता. आता 8 व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सरकारची मोठी भेट
वेतन आयोग साधारणतः 10 वर्षांच्या कालावधीत लागू होतो. याच अनुषंगाने नरेंद्र मोदी सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. याआधी 7 व्या वेतन आयोगाची स्थापना 28 फेब्रुवारी 2014 रोजी करण्यात आली होती, आणि 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाची मंजुरी ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब ठरली आहे.