महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चालूच आहे. या पावसामुळे राज्याला मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढू शकते आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात मुसळधार पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. ताशी 70 किलोमीटर वेगानं हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकण्याची शक्यता असून, त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात ताडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुंदु्र्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
24 मे पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.