IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात मान्सून येऊन पोहोचला आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरू शकतो. राज्यातील हवामानाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.
हे पहा – कंगना राणावत ला CISF लेडी कॉन्स्टेबल ने लगावली कानशिलात काय आहे प्रकरण बघा👇
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
गोव्याच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे, तिथे मोसमी पाऊस वेगाने पुढे सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट होती, पण आता ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसासह वादळाचा इशारा दिला आहे. या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत राहू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पोहोचला आहे. पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.