Maharashtra Weather update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यात १९ जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी दमदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा सामना करावा लागू शकतो.
या दिवशी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सौराष्ट्राला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावर एक चक्रीवादळ घोंघावत असून उत्तर- दक्षिण कुंड या चक्रवाती परिवलनापासून दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी उष्णकटिबंधीय पातळीत जाते.
पूर्व-पश्चिम कुंड गोव्यापासून दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेशापर्यंत चालते आणि केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी उष्णकटिबंधीय पातळीत चक्रीवादळ आहे, असे आयएमडीने त्यांच्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.
पुढील पाच दिवसांत राज्यातील पश्चिमेकडे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १७ ते २१ जून दरम्यान मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
आयएमडीच्या माहितीनुसार, देशात १ जूनपासून सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. दक्षिणेकडील काही राज्यांव्यतिरिक्त जवळजवळ सर्व प्रदेशांमध्येपर्जन्यमानात घट दिसून येत आहे.दरम्यान, काही वायव्य राज्यांमध्येउष्णतेची लाट कायम आहे.
मुंबईत सध्या रोज असे ढग दाटून येत असल्याने शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट दिसून आली. सांताक्रुझ वेधशाळेमध्ये सोमवारी किमान 28 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. बुधवारी (25/32 अंश सेल्सिअस) तापमान आणखी घसरेल. हेच कमाल तापमान पुढील दोन दिवस राहील. आठवड्याच्या शेवटी पारा 31 अंशांवर स्थिरा- वेल. शनिवारी आणि रविवारी मोठ्या सरी कोसळतील, असे सांगण्यात आले आहे.