केंद्र सरकारचा मोठा निर्णय : १ नोव्हेंबरपासून आधार कार्डसंबंधित काही नवीन नियम लागू

आधार कार्ड नवीन नियम: नमस्कार मित्रांनो! १ नोव्हेंबरपासून आधार कार्डसंबंधित काही नवीन नियम लागू होत आहेत. केंद्र सरकारने आधार कार्ड सेवा आणि त्याच्या वापरासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या नियमांमध्ये आयकर वितरण आणि पॅनसाठी आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा विचार केला जाणार नाही.

Table of Contents

👇👇👇

सविस्तर माहिती येथे क्लिक करून पाहा

नवीन नियम काय आहेत?

ऑगस्टपासून केंद्र सरकारने पॅनसाठी अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांकाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, आयकर आणि पॅनसाठी ऑनलाइन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक उपलब्ध होता, पण आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. ही सुविधा २०१७ पासून कार्यान्वित होती, परंतु पॅनच्या गैरवापरामुळे ही सुविधा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

👇👇👇

अधिक माहिती येथे वाचा

केंद्र सरकारने हा निर्णय का घेतला?

आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने एकापेक्षा अधिक पॅन क्रमांक तयार करण्याची शक्यता होती. त्यामुळे पॅन क्रमांकाचा गैरवापर होऊ शकतो. पॅन हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्याचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आधार क्रमांक आणि आधार नोंदणी क्रमांकातील फरक काय?

आधार क्रमांक १२ अंकी असतो, तर आधार नोंदणी क्रमांक १४ अंकी असतो. आधार अर्ज भरताना नोंदणी क्रमांक दिला जातो, ज्यात नोंदणीची तारीख आणि वेळ नमूद असते. मात्र आता पॅनसाठी आधार नोंदणी क्रमांक मान्य केला जाणार नाही.

हा निर्णय पॅन आणि आधारच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे दस्तऐवजांचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल.

Leave a Comment