Anganwadi Recruitment 2025 : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
महत्त्वाची माहिती:
भरती विभाग महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन भरती प्रकार सरकारी नोकरी भरती श्रेणी राज्य शासन मान्य भरती पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा) वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे (विधवा महिलांसाठी कमाल 40 वर्षे ) अर्ज पद्धती ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 05 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 निवड प्रक्रिया शैक्षणिक गुण व अतिरिक्त गुणांवर आधारित
पात्रता व आवश्यक अटी:
उमेदवार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
शासनाने निश्चित केलेला स्थानिक रहिवासाचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
निवड प्रक्रिया:
गुणांकन पद्धत गुण (एकूण 100 गुण) शैक्षणिक गुण (१२ वी, पदवी, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed, MSCIT इ.)80 गुण अतिरिक्त गुण: 20 गुण – विधवा / अनाथ उमेदवार 10 गुण – अनुसूचित जाती / जमाती 05 गुण – इतर मागास प्रवर्ग / भटक्या जमाती / आर्थिक दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग 03 गुण – अंगणवाडी सेविका / मिनी सेविका / मदतनीस पदाचा 2 वर्षांचा अनुभव 05 गुण
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात ऑफलाइन स्वरूपात पाठवावा. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.)
टीप:
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे.