गाय-म्हैस गोठा अनुदान: 77 हजार मिळवा! अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

Cow buffalo anudan:  इतर जोडधंदे करणे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. शेतीला पूरक जोडधंदे म्हणजे शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसाय जसे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, पिके इत्यादी. या व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

सध्या शेतीला पूरक मोठ्या प्रमाणावर जोडधंदे केले जात आहेत. त्यामुळे पशुसंवर्धनाची गरज भासते. शेतकऱ्यांना पशुपालनासाठी गोठ्याची व्यवस्था करावी लागते. म्हशीसाठीही गोठ्याची गरज भासते. त्यामुळे राज्य सरकारने म्हैस गोठा अनुदान योजना सुरू केली आहे.

म्हैस गोठा अनुदान योजना

म्हैस गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना लाभ घेता येतो. मोठ्या प्रमाणावर अनुदान योजनेअंतर्गत दिले जाते आणि त्या अनुदानातून सर्व सामान्य नागरिक म्हशीसाठी गोठा उपलब्ध करू शकतात.

योजनेचे उद्दिष्ट:

शेतकऱ्यांना म्हशी पाळण्यासाठी व त्यांच्या व्यवसायास चालना देण्यासाठी गोठ्यांची उभारणी करणे.

शेतकऱ्यांचे दुग्धव्यवसायातील उत्पन्न वाढवणे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पशुसंवर्धनाला चालना देणे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड झाल्यास सरासरी ७७,५०० रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. ही मदत गोठ्या उभारणीसाठी दिली जाते. ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जाते, म्हणून महाराष्ट्रातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी दाखला
  3. मोबाईल क्रमांक
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. सातबारा
  6. आठ अ
  7. बँक पासबुक

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जाचा पीडीएफ डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढावी आणि विचारली गेलेली संपूर्ण माहिती अर्जामध्ये योग्य प्रकारे भरावी. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समिती कार्यालयात जमा करावा. लाभार्थ्यांची निवड झाल्यास त्यांना अनुदान दिले जाईल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना म्हशी पाळण्यासाठी व त्यांच्या व्यवसायास चालना मिळेल. दुग्धव्यवसायाचे उत्पन्न वाढेल

Leave a Comment