IMD Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) फोरकास्टचा आढावा घेतल्यास मुंबईत गेले तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. आज यलो अलर्ट असल्याने तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तशीच स्थिती राहणार असून वीकेंडला ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे आठवडा अखेर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, उद्या यलो अलर्टमुळे पावसाचे प्रमाण कमी असेल. रायगडसह कोकणात मोठ्या सरी पडत राहतील, असे आयएमडीने सांगितले आहे.सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळांनी आज मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे.
मंगळवारच्या तुलनेत कमाल तापमान ६ अंशांनी वाढले आहे. गुरुवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत थोडे घटले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान पुन्हा ३० अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.