कुसुम सोलर योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे पंप मिळू शकतात. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. कुसुम योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे करणे आवश्यक आहे. या लेखात आपण सेल्फ सर्वे कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
सेल्फ सर्वे म्हणजे काय?
सेल्फ सर्वे ही एक ऑनलाइन प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयी काही माहिती देणे आवश्यक असते. ही माहिती महाऊर्जा कंपनीला सौर पंप बसविण्यासाठी आवश्यक असते. सेल्फ सर्वेमध्ये शेतकरी त्याची शेतजमीन, विहिरीची माहिती आणि शेतीविषयक इतर तपशील देतो. शिवाय शेतातील विहिरीची तीन छायाचित्रेही द्यावी लागतात.
Well anudan:मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत मिळवा ४ लाखापर्यंत अनुदान! असा करा अर्ज
सेल्फ सर्वे कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलवर आलेल्या महाऊर्जाकडून आलेल्या सेल्फ सर्वे लिंकवर क्लिक करावा लागेल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकून ओटीपी टाकावी लागेल.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला “तपशील” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर “सेल्फ सर्वे करा” या ऑप्शनवर क्लिक करा.
आता तुम्हाला शेतीविषयक काही तपशील भरावे लागतील जसे शेतजमिनीचा पत्ता, शेतजमिनीचे क्षेत्रफळ, विहिरीचा प्रकार इत्यादी.
तुम्हाला तीन फोटो शेतातील विहिरीचे काढून अपलोड करावे लागतील.
शेवटी तुम्हाला डिजिटल सही करावी लागेल.
सर्व तपशील भरल्यावर “ओके” वर क्लिक करा.
याप्रमाणे सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सेल्फ सर्वे करू शकता. सेल्फ सर्वेनंतर तुमच्याकडून पेमेंटची रक्कम मागितली जाईल. ही रक्कम भरल्यानंतरच तुम्हाला सौर पंप मिळेल. सेल्फ सर्वे आणि पेमेंट यशस्वीरित्या केल्यानंतर मिळणाऱ्या सौर पंपामुळे तुम्हाला शेती खर्चात बचत होईल आणि पर्यावरणही वाचेल