Ladki Bahin Yojana 7th Installment : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी सुरु केलेली एक विशेष योजना आहे. या योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत देण्यात येते. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा योजनेचा उद्देश आहे.
योजनेचे तपशील
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
---|---|
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना |
आर्थिक मदत | ₹1500 प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन क्रमांक | 181 |
अर्हता
अटी | तपशील |
---|---|
रहिवासी | अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
बँक खाते | स्वतःचे बँक पासबुक असणे आवश्यक |
आधार लिंकिंग | बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक |
आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रांचे नाव | तपशील |
---|---|
आधार कार्ड | ओळखपत्रासाठी अनिवार्य |
बँक पासबुक | आर्थिक मदतीच्या ट्रान्सफर साठी अनिवार्य |
अधिवास प्रमाणपत्र | महाराष्ट्रातील स्थायिकतेचा पुरावा |
राशन कार्ड/जन्म प्रमाणपत्र/मतदान कार्ड | 15 वर्षांपूर्वीचे कोणतेही एक प्रमाणपत्र |
उत्पन्नाचे प्रमाणपत्र | आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी |
फोटो | अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो |
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
- वेबसाईटला भेट द्या:
ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. - खाते तयार करा:
होमपेजवर Create Account? या पर्यायावर क्लिक करा. Sign-Up फॉर्म भरून युजर आयडी व पासवर्ड तयार करा. - लॉगिन करा:
तयार केलेल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगिन करा. - अर्ज भरावा:
लॉगिन केल्यानंतर Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana Application या पर्यायावर क्लिक करा. - आधार क्रमांक पडताळणी:
आधार क्रमांक व कॅप्चा टाकून Validate Aadhar वर क्लिक करा. - माहिती भरा:
अर्जामध्ये आधार प्रमाणे नाव, पत्ता आणि इतर तपशील भरावा. - कागदपत्र अपलोड करा:
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – ऑफलाईन
- महसूल कार्यालय किंवा सीएससी सेंटरला भेट द्या.
- अर्जाचा फॉर्म भरा:
उपलब्ध फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करा. - प्रक्रिया पूर्ण करा:
अर्ज तपासून अधिकृत प्रक्रिया सुरू केली जाईल.
महत्त्वाचे फायदे
स्वावलंबी बनण्यास मदत होईल.
राज्यातील गरीब महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
महिलांना कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य करता येईल.