DA hike update : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) 2% ने वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे DA आता 53% वरून 55% होणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या लागू होण्यापूर्वी करण्यात आली आहे.
किती कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा DA hike update
केंद्र सरकारच्या 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा फायदा होणार आहे. सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ करते. पेन्शनधारकांना महागाई राहत (DR) याच दराने मिळते. मागील 7 वर्षांतील ही सर्वात कमी वाढ असल्याचे समजते. यापूर्वी जुलै 2018 मध्ये 2% वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये 3% वाढ आणि मार्च 2024 मध्ये 4% वाढ करण्यात आली होती. DA आणि DR ची वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) च्या आधारावर केली जाते.
किती होणार वेतनवाढ
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत वेतन (Basic Pay) 36,500 रुपये असेल, तर सध्याचा DA 19,345 रुपये मिळतो. 2% वाढ झाल्यानंतर त्याचा DA 20,075 रुपये होईल. याशिवाय जानेवारीपासून एरियर (arrear) सुद्धा मिळेल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या पेन्शनधारकाची मूलभूत पेन्शन 9,000 रुपये असेल, तर सध्या 4,770 रुपये DR मिळतो. 2% वाढ झाल्यानंतर त्याला 4,950 रुपये DR मिळणार आहे.
कसे ठरवले जाते DA?
DA वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) च्या मागील 12 महिन्यांच्या सरासरी आकड्यांवर आधारित असते. यासाठी केंद्र सरकार निश्चित फॉर्म्युला वापरते. सध्या देशभरात 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना या वाढीचा थेट लाभ होणार आहे.