IMD Alert : राज्यात काही तासांत मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना बसणार वादळाचा तडाखा

Maharashtra IMD Alert : महाराष्ट्रात अवेळी पाऊस पडत आहे, पाऊस अजूनही सुरू आहे. आजही हवामान खात्याकडून (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात अवेळी पाऊस सुरू आहे, आणि पाऊस अजूनही थांबलेला नाही. आज हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Table of Contents

महाराष्ट्रात मान्सून 12 जून पर्यंत दाखल होणार

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांसह जोरदार पाऊस पडू शकतो. पावसासोबत गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भातही विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील काही भागांत गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

TATA Altroz ची स्टायलिश कार, 26kmpl मायलेज सह Creata ला भारी पडेल, पहा किंमत

हवामान खात्याने आज नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने जालना, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी फक्त पाऊसच नाही, तर वादळी वाऱ्याचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पावसाबरोबर वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती येथे पहा

मुंबई आणि उपनगरात दिवसभर गरमी राहणार आहे, परंतु संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

Leave a Comment