आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख निश्चित झाली, यंदा मान्सून महाराष्ट्रात या दिवशी दाखल होणार

Maharashtra Mansoon Update : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाच्या त्रासातून सुटका होणार आहे कारण मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर झाली आहे. यंदा नैऋत्य मान्सून काही दिवस आधी, म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस, केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की 31 मे रोजी नैऋत्य मान्सून केरळात पोहोचू शकतो. या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Table of Contents

HDFC बँकेचे Pixel credit Card launch, 5% cashback आणि 500/- रुपये वार्षिक शुल्क

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी ही माहिती दिली होती. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज दिला होता. आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात बरसणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यंदा महाराष्ट्रातही मान्सून चांगला असेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

या पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये तुम्हाला 5 वर्षासाठी मिळतील दर महिन्याला 9,250/- रुपये

भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळात दाखल होऊ शकतो. मागील वर्षी मान्सून 4 जून रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात तो 8 जूनला आला. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून पोहोचेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. साधारणतः मान्सून 1 जूनला केरळात दाखल होतो, पण यंदा तो लवकर येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात मान्सून 12 जून ला दाखल होऊ शकतो.

अधिक माहिती येथे वाचा

यंदा मान्सून सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात राहील अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी, 2023 मध्ये, मान्सून कमकुवत होता, परंतु यंदा तो समाधानकारक आणि चांगला असेल असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, जगभरातील हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो कमकुवत होतो आहे आणि ला निनोची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment