Maharashtra weather Update : राज्यात आज जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

IMD weather Update : महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Table of Contents

PhonePe वरून तात्काळ मिळवा 50,000/- रुपये कर्ज, अशी करा प्रोसेस

आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे. आज राज्यभर पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासाठी काही भागांमध्ये यलो, काही ठिकाणी ऑरेंज, आणि काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 जागांसाठी भरती जाहिरात, पहा सविस्तर

पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, आणि येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये वादळ, सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra weather Update : राज्यात आज जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो.

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment