आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’ लागू होणार, महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार

आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करण्याची शक्यता आहे.

जुलै मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार तब्बल 19,200/- रुपये वाढ

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सहाय्य करणे हा आहे.

SBI बँक देत आहे, 8 लाख रुपये कर्ज, असा करा अर्ज

‘लाडली बहना योजना’ काय आहे?

मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहणा’ योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. मध्य प्रदेशात या योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या योजनेच्या आधारे शिवराजसिंह यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतानं विजय मिळवला. महिला मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपने 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवला.

पांढऱ्या रेशन धारकांनाही मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार, पहा आताची मोठी बातमी

त्यामुळे, शिवराजसिंह चौहान यांच्या योजनेचं प्रारूप महाराष्ट्रातही लागू केल्यास महायुतीला फायदा होईल, अशी महायुतीच्या घटकपक्षांना आशा आहे. म्हणूनच, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू होण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने काही शासकीय अधिकारी मध्य प्रदेशला पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन सदरील योजनेचा अभ्यास केला. ही योजना कशी चालवली जाते आणि त्याचे प्रारूप काय आहे, हे त्यांनी पाहिले. आता ही योजना महाराष्ट्रात लागू करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती येथे पहा

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे फायदे काय?

या योजनेद्वारे गरीब महिलांना आर्थिक मदत पुरवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रति महिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. दारिद्र्यरेषेखालील 21 ते 60 वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम दर महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Leave a Comment