Mukhymantri Yuva Kary Prashikshan:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत.
शासनाचे पुरवणी पत्र :-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दि. १०.०३.२०२५ चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ नंतर पुढील उप परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहेत:-
(१) सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही.
(२) या योजनेंतर्गत आस्थापना /उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि, सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरुपी नोकरीचा हक्क राहणार नाही.
२. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०३१११३०३३३७९०३ असा आहे. हे शासन पूरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महत्वाची महिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.