Ration card : रेशन दुकानात गहू, तांदूळ आणि साखर मिळणे बंद होणार, हे काम लवकर करा
रेशन दुकानात मोफत मिळणारे गहू, तांदूळ आणि साखर मिळणे बंद होणार, या संदर्भात महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत, तुमचे रेशन कार्ड मध्ये नाव असेल आणि तुम्ही जर मोफत रेशन दुकानात गहू, तांदूळ आणि साखर या तीन वस्तूंचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणे बंद होऊ शकते, कारण तुम्हाला रेशन कार्ड संदर्भात e-KYC करणे गरजेचे आहे.
Ekyc कशी कराल या बाबत पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
स्टेप 1:
तुमच्या मोबाईलमध्ये “Mera Ration” किंवा “Mera KYC” अॅप आणि “Aadhaar FaceRD” अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा.
स्टेप 2:
अॅप ओपन करा आणि लोकेशन किंवा राज्य निवडा.
स्टेप 3:
तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाका आणि आलेला OTP भरा.
स्टेप 4:
तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. तेव्हा “Face e-KYC” हा पर्याय निवडा.
स्टेप 5:
कॅमेरा ऑन होईल. तुमचा चेहरा स्कॅन करा (सेल्फी घ्या) आणि सबमिट करा.
स्टेप 6:
तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
जर तुम्ही राशन कार्डसाठी 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी (e-KYC) केले नाही, तर तुम्हाला मोफत धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते.
जर मोबाईलवर हे शक्य नसेल, तर जवळच्या सार्वजनिक वितरण दुकानावर (स्वस्त धान्य दुकान) जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.