कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारणे बाबत महत्वाचा शासन निर्णय जारी!Regarding acceptance of resignation from government service by employees

Regarding acceptance of resignation from government service by employees:शासकीय अधिका-याचा/कर्मचा-याचा शासकीय सेवेच्या राजीनाम्याचा अर्ज सक्षम प्राधिका-याकडे प्राप्त झाल्यानंतर तो स्वीकारण्याच्या शर्ती, व अवलंबावयाची कार्यपध्दती या संदर्भात शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत.

तरी देखील काही शासकीय कार्यालयांकडून राजीनामा स्वीकृतीच्या विहित शर्ती, व अवलंबावयाच्या कार्यपध्दतीचे अनुपालन योग्य रितीने होत नसल्याचे व परिणामतः राजीनामा स्वीकृतीचे त्रुटीपूर्ण सदोष आदेश निर्गमित केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

संबंधितांकडून राजीनामा प्राप्त झाल्यानंतर सक्षम प्राधिका-याने विहित मुदतीत राजीनामा स्वीकारल्याचे आदेश त्यास लेखी स्वरुपात न कळविल्यामुळे संबंधित शासकीय अधिका-याने/कर्मचा-याने दीर्घ कालावधीनंतरही राजीनामा मागे घेण्याची विनंती केल्यास, त्याची विनंती मान्य करावी किंवा कसे असा प्रश्न सक्षम प्राधिका-यापुढे उपस्थित होतो.

तेव्हा राजीनामा स्वीकारण्याची कार्यपध्दती निर्दोष असावी म्हणून याबाबत सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करून शासन आता पुढीलप्रमाणे सुधारित आदेश देत आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment