Important circular issued regarding payment of house rent allowance difference to employees: उपरोक्त विषयी व संदर्भान्वये कळविण्यात येते कि, जुलै 2021 पासुन शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 24% वरुन 27% पर्यंत करण्यात आली आहे.
माहे ऑक्टोंबर 2021 पासुन प्रत्यक्ष 27 टक्के प्रमाणे वाढ देण्यात आली आहे. मात्र जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली.
मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध न केल्याने , ही थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.
असे श्री. अनिल बोरनारे, संयोजक मुंबई व कोकण विभाग यांनी संदर्भिय निवेदनाद्वारे संचालनालयास कळविले आहे.
त्यानुसार आपल्या विभागातील किती शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीचा घरभाडे भत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे याचा आढावा घेवून थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी व लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी 11 माही अंदाजपत्रकात करण्यात यावी.
सदर थकती देयकांचा कालावधी हा 01 वर्षावरील असल्याने शासन निर्णय दि. 15 जुलै 2017 अन्वये सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक आहे.
सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झालेनंतर शालार्थमध्ये टीए एरिअर्स टॅब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.