शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीत (MAKAUT) एक चर्चेत आलेली घटना उघडकीस आली आहे. अप्लाइड सायकॉलॉजी विभागातील प्राध्यापिका डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एका विद्यार्थ्यासोबत विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये त्या नववधूसारख्या सजलेल्या दिसत असून, विद्यार्थ्याने त्यांच्या भांगेत कुंकू भरतानाचा क्षणही दिसत आहे.

👉👉व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

व्हिडीओसोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्रही व्हायरल

या घटनेच्या व्हिडीओव्यतिरिक्त विवाह नोंदणीसंदर्भातील एक हस्तलिखित प्रमाणपत्र देखील व्हायरल झाले आहे. यात तीन साक्षीदारांसह विद्यार्थ्याची व प्राध्यापकाची सही दिसते. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्राध्यापिकेला तात्पुरत्या स्वरूपात सुट्टीवर पाठवले आहे.

डॉ. पायल बॅनर्जी यांची बाजू

घटनेनंतर वाद निर्माण झाल्यावर डॉक्टर पायल बॅनर्जी यांनी हा केवळ फ्रेशर्स पार्टीचा एक नाट्यमय उपक्रम असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, काही विद्यार्थ्यांनी जाणूनबुजून हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला आहे. त्यांनी याला बदनामीसाठी रचलेला कट म्हणत या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

विद्यापीठ प्रशासनाची भूमिका

विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू तपस चक्रवर्ती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, हे कृत्य विद्यापीठाच्या मानकांशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास समिती गठीत करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी असेही प्रश्न उपस्थित केला की, जर हा प्रकल्पाचा एक भाग असेल तर विभाग प्रमुखाला सुट्टीवर का पाठवण्यात आले?

शिक्षक संघटनेची तक्रार

विद्यापीठातील प्राध्यापक सुशांतो काय यांनीही डॉक्टर बॅनर्जी यांच्या दाव्याला आव्हान दिले आहे. शिक्षक संघटनेने या घटनेविरुद्ध तक्रार नोंदवली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Comment