Weather update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
आजही हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किलोमीटर असेल, तसेच काही भागांत वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. Weather update
पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज
पुण्यातील काही भागात बेमोसमी पाऊस झाला असून, पुढील ३ ते ४ तासांत पुन्हा जोरदार सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर दिसून येणार आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यनगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांसाठीही पावसाचा इशारा दिला आहे.