100 कि.मी वेगाने शक्ती चक्रीवादळाची तिव्रता वाढनार, पहा महाराष्ट्रावर काय परिणाम ? Cyclone Rain Alert
Cyclone Rain Alert :हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘शक्ती’ हे चक्रीवादळ तीव्र होत असून,अधिक शक्तिशाली रूप धारण करू शकतं. हे या हंगामातील पहिलं मोठं चक्रीवादळ ठरण्याची शक्यता असून, अरबी समुद्रात हे चक्रीवादळ गुजरातमध्ये द्वारकेच्या दिशेनं सरकत आहे.
या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीला धोका नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय. किनारपट्टीला येईपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल आणि ते पुन्हा ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
शक्ती चक्रीवादळामुळे ३ ते ५ ऑक्टोबर उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५-५५ किमी प्रती तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग वाढू शकतो. किनारपट्टीला धोका नसला तरी महाराष्ट्रात इतरत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मराठवाड्यासह पूर्व विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
शक्ती चक्रीवादळाचा वेग सध्या १०० किमी प्रतितास इतका आहे. याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असली तरी किनारपट्टीवर येईपर्यंत त्याची तीव्रता कमी होईल. पण समुद्र खवळलेला राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ५ ऑक्टोबरपर्यंत ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत हवामानात अचानक बदलाची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा धोकाः ‘शक्ती’ चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर जात असले तरी, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या किनारी भागांवर कायम आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचे वारे आणि समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता आहे.