nps ups pension scheme New GR:राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची “सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्ती योजना” (UPS) लागू करणेबाबत.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये आपणास कळविण्यात येते की, वित्त विभागाने संदर्भ क्र. १ शासन निर्णय निर्गमित केला आहे. संदर्भ क्र. २ व ३ नुसार शासनाने व मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.
सर्व नवीन अपडेट येथे क्लिक करून पहा
“राज्यशासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा (One Time Password) विकल्प दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांचेकडे सादर करावा.”
संदर्भ क्र. १ च्या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधिनस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावरून होणे आवश्यक आहे.
त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्र. १ शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बाबतीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक २५/०३/२०२५ पूर्वी संचालनालयास सादर करावा.