जिल्हा परिषद उपकर अंतर्गत 20% आणि 5% दिव्यांग योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविणे सुरु झाले आहेत. समाज कल्याण विभागाने विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे.
आता LPG गॅस सिलेंडर मिळणार फक्त 520 रुपयांना फक्त हे काम करा
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून किमान 20% रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि नवबौद्ध यांच्यासाठी आणि 5% दिव्यांग व्यक्तींसाठी खर्च करणे आवश्यक असते.
रेशन कार्ड धारकांना खुशखबर ! आता धान्य ऐवजी मिळणार पैसे
या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून काही योजनांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. अर्जदारांनी आपले सविस्तर भरलेले अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रक येथे पहा
जिल्हा परिषद योजना 2024 साठी पात्रता
- अर्जदार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) किंवा नव बौद्ध या गटातील असावा.
- संगणक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा.
- पिको फॉल शिलाई मशीन योजनेसाठी महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- वर दिलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असणे आवश्यक आहे.
- अपंग लाभार्थ्यांसाठी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे युडीआयडी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ज्या योजनांसाठी विद्युत पुरवठा आवश्यक आहे, त्यासाठी विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- तहसीलदारांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
SBI बँक देत आहे आठ लाखांचे कर्ज या स्टेप फॉलो करा, तात्काळ पैसे खात्यात जमा
आवश्यक कागदपत्रे
1. यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
2. आधार कार्डची झेरॉक्स
3. घरकुलसाठी आठ अ चा उतारा (हा कागद आवश्यक आहे) ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे, त्यामुळे अर्जदार ग्रामीण भागातीलच असावा.
स्कूटर विथ ऍडॉप्शन चालवण्यासाठी लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना असणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदे अंतर्गत विविध योजना सुरू झाल्या असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून जिल्हा परिषद योजना 2024 चा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यातील इतर जिल्हा परिषद मध्ये ही उपकर योजने अंतर्गत वरील घटकातील गरजूंना लाभ दिले जातात, त्या संबंधी माहिती ही आपण जशी उपलब्ध होईल तशी देऊ; परंतु तुम्हाला जर सदर योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाला तुम्ही भेट देऊ शकता.