लाडकी बहिण योजना : डिसेंबरनंतर याच महिलांना मिळणार लाभ (6 वा हप्ता), तुम्ही पात्र आहात का पहा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पात्रतेबाबत नवीन अपडेट

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी जुलै 2024 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेंतर्गत, पात्र महिलांना महाडीबीटी प्रणालीद्वारे दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत एकूण पाच हप्त्यांत राज्यातील दोन कोटी 34 लाख महिलांना 7500 रुपये देण्यात आले आहेत.

याच महिला ठरणार पात्र, यादी पहा

डिसेंबरनंतर काही महिलांना होणार अपात्र

राज्य सरकारच्या ताज्या निर्णयानुसार, काही महिला डिसेंबरनंतर या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. अपात्र ठरलेल्या महिलांना डिसेंबरनंतर पैसे मिळणार नाहीत. योजना सुरू झाल्यापासूनच अनेक अपात्र महिलांनी अर्ज केले होते, ज्या त्यांच्या कुटुंबातील काही नियमांचे उल्लंघन करतात.

पात्र महिलांची संख्या पहा

योजना अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल

महिला व बालविकास विभागाने योजना अर्ज प्रक्रियेत बदल केला आहे. यापुढे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडेच करता येणार आहे. तसेच, या प्रक्रियेत कुटुंबाच्या चार चाकी वाहनांसारख्या मालमत्तेच्या तपासणीत महत्त्व दिले गेले आहे.

अटी व नियमांची पुनर्तपासणी

विधानसभा निवडणुकांनंतर पात्र महिलांची पुन्हा पडताळणी होईल. ज्या महिलांनी सर्व नियम व अटींचे पालन केलेले नाही, त्या अपात्र ठरतील. योजना प्राप्त करण्यासाठी अटींनुसार, चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पाहा

नवीन पात्रतेबाबत महिलांनी ध्यानात ठेवावे

योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी सर्व पात्रतेचे निकष पूर्ण केले पाहिजेत, अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही.

Leave a Comment