Land division 2024: ज्या अर्थी महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) सुधारीत अधिसुचना 2021 च्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) 2001 चे कलम 3 मधील पोट कलम (1) मध्ये 1 जानेवारी 2001 या मजकुराऐवजी 31 डिसेंबर 2020 हा मजकूर दाखल करण्यात आला आहे.
ज्या अर्थी महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र प्रकाशन दिनांक 13 ऑगस्ट 2001 मुळ अधिनियमामध्ये गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव अधिनियम अस्तित्वात आल्यापासून सहा महिने किंवा नियोजन प्राधिकारी वाढव न देतील अशा मुदतीत दाखल करण्यात येतील अशी तरतुद करण्यात आली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) सन 2001 चा अधिनियम क्र.27 दि. 13 ऑगष्ट 2001 मधील कलम 20 नुसार नियोजन प्राधिकरणाचे पुढील अधिकारी नियोजन प्राधिकरणाच्या अधिकारांचा वापर करतील आणि त्यांचे कर्तव्य पार पाडतील अशी तरतुद आहे.
क) महानगरपालिकेच्या बाबतीत, संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा या बाबतीत तो नियुक्त करील असा इतर अधिकारी;(ख) नगर परिषदेच्या बाबतीत, संबंधित नगर परिषदेचा मुख्याधिकारी;
ग) नागपूर सुधार प्रन्यास किंवा विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या बाबतीत, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अशा प्राधिकरणांना लागू असलेल्या, अधिनियमाखालील अशा अधिकारांचा वापर करणारी व्यक्ती;(घ) जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत, एकतर जिल्हाधिकारी किवा यासंबंधात तो प्राधिकृत करील असा इतर अधिकारी
त्या अर्थी, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) सन 2001 था अधियम क्र.27 दि. 13 ऑगष्ट 2001 मधील प्राप्त अधिकारानुसार मी जिल्हाधिकारी बीड गुंठेवारी विकासाचे नियमाधिन करणे व श्रेणीवाढ करणे बाबत महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र प्रकाशन दिनांक 13 ऑगस्ट 2001 मधील कलम 4 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) सुधारीत अधिनियम 2021 मध्ये दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिल्यानुसार संदर्भीय राजपत्र कायद्यातील तरतुदीनुसार दि.31 डिसेंबर 2020 रोजी पर्यंतच्या प्रकरणात गुंठेवारी नियमाधिन करणे करीता दि.31.03.2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाद्ध व नियंत्रण) बाबतचे सर्व अभिलेखे व नोंदवहया जतन करुन ठेवाव्यात. असे आदेश दि.30/09/2024 नुसार माझ्या सही शिक्यानीशी देत आहे.