LPG Price Hike : गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ, पहा नवीन ताजे दर

LPG Price Hike : केंद्र सरकारने नुकतीच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ जाहीर केली असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार असून, प्रत्येक घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ सामान्य ग्राहकांसाठीच नव्हे, तर ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’च्या लाभार्थींनाही लागू होणार आहे.

Table of Contents

इतकी झाली वाढ LPG Price Hike

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती जाहीर करताना सांगितले की, उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित सिलेंडरची किंमत आता ५०० रुपयांवरून ५५० रुपयांवर जाणार आहे. यामुळे गरिब व वंचित घटकांनाही या महागाईची झळ बसणार आहे. तर, इतर सर्वसामान्य ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची किंमत ८०३ रुपयांवरून थेट ८५३ रुपये करण्यात आली आहे.

गॅसच्या किंमतींचा आढावा

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ही दरवाढ तात्पुरती असून, दर २-३ आठवड्यांनी गॅसच्या किंमतींचा आढावा घेण्यात येतो. त्यामुळे भविष्यात किंमतीत काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.

या दरवाढीच्या मागे सरकारने उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या सुमारे ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करणे हा आहे. मागील काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमतीमुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंवरील वाढती किंमत

सद्यपरिस्थितीत, महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी ही दरवाढ चिंतेची बाब आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल अशा जीवनावश्यक वस्तूंवरील वाढती किंमत ही थेट घरगुती बजेटवर परिणाम करत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment