maharashtra-school-cbse-pattern-news महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार – शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार – शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

CBSE अभ्यासक्रम का लागू होणार? maharashtra-school-cbse-pattern-news

राज्य सरकारने हा निर्णय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी घेतला आहे. सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रमाच्या नव्या आराखड्यास मंजुरी दिली असून, या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल.

अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

2025-26 पासून: फक्त पहिलीच्या वर्गासाठी CBSE अभ्यासक्रम लागू होईल.
पुढील वर्षीपासून: दरवर्षी पुढील वर्गांसाठी टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम लागू केला जाईल.
इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत: सर्व शाळांसाठी CBSE अभ्यासक्रम मंजूर करण्यात आला आहे. maharashtra-school-cbse-pattern-news

मराठी माध्यमात पाठ्यपुस्तक उपलब्ध

CBSE अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार निर्णय

हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथे झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीतील चर्चा
या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, भविष्यातील दिशा आणि धोरणाची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली. शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले.

CBSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयार होता येईल आणि शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारला जाईल. दादा भुसे यांनी या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षण समृद्ध होईल, असे विधान परिषदेत सांगितले.

Leave a Comment