राज्यात तीन दिवस उष्णतेची अतितीव्र लाट, पहा कोणत्या जिल्ह्यात उष्णतेचे कसे अलर्ट !

राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाली आहे. आगामी तीन दिवसांत विदर्भाचा पारा 48 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अकोला या तीन शहरांना उष्णतेचा ऑरेंज, तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, धाराशिव या शहरांना यलो अलर्ट दिला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

पश्चिमेकडील वाऱ्याचा पॅटर्न बदलल्यामुळे महाराष्ट्रापासून दक्षिण गुजरातपर्यंत आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे पश्चिम मध्य भारतामध्ये दिवसाच्या तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेशात ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे या तीन राज्यांत दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात का वाढतेय उष्णता…

रेमल चक्रीवादळाच्या प्रभावाने अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील वाऱ्याच्या पॅटर्न बदलला आहे. वाऱ्यातील आर्द्रता चक्रीवादळाने खेचून घेतल्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशात उष्णतेची लाट, तर पूर्वोत्तर भारतात महाराष्ट्रा आधी मान्सून लवकर सक्रिय होण्याची श्यकता आहे.

उष्णतेच्या लाटेचे अलर्ट असे आहेत

ऑरेंज अलर्ट :- (अतितीव्र): यवतमाळ, चंद्रपूर, अकोला

येलो अलर्ट :- (मध्यम) कोल्हापूर, मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, धाराशिव.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment