Weather Update : दक्षिण मध्य महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) तसेच हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महिला सन्मान योजना 2024 – प्रत्येक महिलेला मिळणार 1000/- रुपये, फक्त हे एक काम करा
पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये मात्र उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
मुसळधार पावसाचा अवकाळी पावसाचा अंदाज, गारपीट या 12 जिल्ह्यांत रेड अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अशंतः ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. येथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 28°C च्या आसपास असेल.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.